महिलेनं धावत्या ट्रेनमधून आधी मुलांना फेकलं, मग स्वतःदेखील घेतली उडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील उज्जैन स्टेशनवर शनिवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मुले आणि त्यांच्या आईचा जीव थोडक्यात बचावला आहे. या घटनेत एका आईने आपल्या दोन निष्पाप मुलांना चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले आणि नंतर स्वतःही ट्रेनमधून उडी घेतली. यादरम्यान त्या स्टेशनवर तैनात असलेल्या असलेल्या कॉन्स्टेबलने कमालीची चपळाई दाखवत महिलेला ट्रेनच्या खाली जाण्यापासून वाचवले. हि महिला आणि तिची दोन्ही मुले पूर्णपणे सुरक्षित आहेत. हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) जोरदार व्हायरल झाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
ही महिला घाईगडबडीत चुकीच्या ट्रेनमध्ये चढली होती. ट्रेन सुरू झाल्यानंतर तिला हे लक्षात आले. त्यानंतर काय करावं हे तिला समजले नाही. तिने ताबडतोब आधी आपल्या मोठ्या मुलाला आणि नंतर धाकट्याला चालू ट्रेनमधून खाली फेकलं. दोघं स्टेशनवर पडल्यावर महिलेनेही चालत्या ट्रेनमधून उडी मारली. उडी मारताच ती ट्रेनसोबत ओढत जाऊ लागली. या महिलेचे नाही बलवत्तर म्हणून डब्याजवळ कॉन्स्टेबल महेश कुशवाह उभे होते. त्यांनी महिलेला ट्रेनखाली जाण्यापासून वाचवत मरणाच्या दारातून परत आणले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (Viral Video) कैद झाली आहे.

ही घटना शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उज्जैन रेल्वे स्थानकावर घडली आहे. पत्नी आणि मुलांसह एक व्यक्ती उज्जैन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचला, मात्र त्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जायचं होतं. हे सर्वजण सिहोरला जात होते. कुटुंबाला स्टेशनवर सोडून नवरा तिकीट काढायला गेला. तो निघताच जयपूर-नागपूर एक्स्प्रेस गाडी स्थानकावर आली. महिलेला वाटलं की आपल्याला या ट्रेननेच जायचं आहे. म्हणून ती घाईघाईने मुलांसह त्यामध्ये चढली. महिलेने ट्रेनमध्ये चढल्यावर आतमधील लोकांकडून माहिती घेतली असता ती चुकीच्या ट्रेनमध्ये चढल्याचं तिला समजले. यानंतर तिला काय करावे ते सुचले नाही त्यानंतर तिने स्वतःसह आपल्या दोन लहान मुलांचा जीव धोक्यात घालून चालत्या ट्रेनमधून उडी घेऊन खाली उतरण्याचा प्रयत्न केला.

हे पण वाचा :

ICICI Bank कडून ​​FD च्या व्याजदरात वाढ !!!

Home Loan : आता घर खरेदी करणे महागणार, LIC हाउसिंग फायनान्सकडून होम लोनवरील व्याजदरात वाढ

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुरक्षा वाढविली; आता ‘या’ दर्जाची पुरवली जाणार सुरक्षा

औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, मनपा आयुक्तांवर दोघांचा हल्ला, सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे आयुक्त बचावले; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

आमिरच्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण; पडद्यामागे नव्हे तर पडद्यावर झळकणार ‘जुनैद’