दीरावर जडले प्रेम; महिलेने सुपारी देत पतीचा काढला काटा

Love Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पैठण : हॅलो महाराष्ट्र – पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचे चुलत दीरासोबत अनैतिक संबंध होते. नंतर त्या महिलेने त्यांच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची सुपारी देऊन हत्या केली. हि घटना पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक याठिकाणी घडली आहे. आपल्या पत्नीचे आपल्या चुलत भावाबरोबर अनैतिक संबंध सुरू असल्याचे समजले तेव्हा पत्नीने आपल्या बहिणीच्या मदतीने 2 लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा अवघ्या १२ तासांमध्ये केला. यामध्ये आरोपी पत्नीसह अन्य तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण
मृत व्यक्तीचे नाव अशोक बाबासाहेब जाधव असे आहे. तो कडेठाण बुद्रुक येथील रहिवासी होता. मृत व्यक्तीची पत्नी रंजना अशोक जाधव हिचे मागील काही दिवसांपासून चुलत दीर रामाप्रसाद शिवाजी जाधव याच्यासोबत अनैतिक संबंध सुरू होते. एके दिवशी अशोक याने आपल्या पत्नीचा मोबाइल चेक केला असता, तिच्या फोनमध्ये चुलत दीर रामाप्रसाद याच्यासोबत अश्लील बातचित केल्याचे फोन रेकॉर्ड होते. यामुळे रंजना आणि अशोक यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.

यानंतर आपले भांडाफोड झाल्याचे समजल्यावर आरोपी महिलेने आपली बहीण मीनाबाई मन्साराम पठाडे हिला फोन करून माझ्या अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याचे सांगितले व पतीची हत्या करायची आहे असे सांगितले. यानंतर तिने आपल्या पतीची हत्या करण्यासाठी आरोपी महिलेने आपल्या बहिणीच्या ओळखीच्या लोकांना 2 लाखांची सुपारी दिली. यानंतर संतोष सारंगधर पवार या व्यक्तीच्या मदतीने अशोक यांचा खून करण्यात आला.

कशा प्रकारे केली हत्या
आरोपींनी अशोक यांना सोमठाणा येथील रेणुका देवी मंदिराच्या डोंगरावर नेले त्यानंतर तिकडे अशोक यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर अशोक यांचा मृतदेह थापटी तांडा परिसरात फेकून देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवली आणि अवघ्या 12 तासांमध्ये या प्रकारचा छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी रंजना अशोक जाधव, रामाप्रसाद उर्फ बाळू शिवाजी जाधव, मीनाबाई मन्साराम पठाडे आणि संतोष सारंगधर पवार या चार जणांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.