औरंगाबाद प्रतिनिधी । शहरात केमिकल कंपन्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दूषित रसायन पाण्यात सोडण्यात येत असल्याने अंघोळीलाही पाणी नाही. या प्रकाराला कंटाळून एका महिलेने शहरातील शिवाजीनगरच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे. दरम्यान शिवाजी नगर पोलिसांनी परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत सदर प्रदूषणा महिलेला ताब्यात घेतलं.
शहरातील केमिकल कंपन्यांमधून निघणारे रसायनयुक्त दूषित पाण्यामुळं नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हे दूषित पाणी पिऊन परिसरातील जनावरे मरत आहेत. तर नागरिकांना विविध आजार होत आहेत. त्यामळं ह्या केमिकल कंपन्या त्वरित बंद झाल्या पाहिजेत या मागणीसाठी शिवाजीनगर परिसरातील शालुताई भोकरे या महिलेने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं.
या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जलकुंभवर जात मोठ्या शिताफीने या महिलेला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.