पतीच्या छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – स्नेहल सागर मांडेकर या महिलेने पतीकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. या प्रकरणात स्नेेेहल यांचा पती सागर बाळु मांडेकर याला अटक करण्यात आली आहे.

स्नेहल हिच्या आईने यासंदर्भात तक्रार दिली आहे. हि घटना गुरुवारी रात्री सुतारदरा येथील शिवसाईनगरमध्ये घडली आहे. सागर हा आपली पत्नी स्नेेेहलच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता.

या छळाला कंटाळून अखेर शेवटी तिने गुरुवारी रात्री आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. यानंतर पोलिसांनी पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. सी. कोळी करत आहेत.