महिला पोलीस अधिकारीचा विनयभंग; भाजप आमदारावर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा प्रतिनिधी। भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी तुमसर विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे यांच्यासह भाजपाच्या शहराध्यक्षांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम किट वितरण प्रसंगी महिला पोलीस निरीक्षके सोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.

१६ सप्टेंबर रोजी तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांना सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किट वाटपासाठी मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष बांधकाम कामगार एकत्र जमले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुमसर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक तैनात होत्या. गर्दीमुळे गोंधळ होऊ नये म्हणून महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग लावण्यात आली होती.

त्या दरम्यान महिलांच्या रांगेत असलेल्या एका गरोदर महिलेला त्रास झाला. त्या महिलेशी पोलीस उपनिरीक्षक बोलत असताना भाजपाचे शहर अध्यक्ष अनिल जिभकाटे तिथे आले असता बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस अधिकारीला एकेरी उल्लेख करुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावेळी आमदार चरण वाघमारेही तेथे उपस्थित होते. मात्र आमदारांनी हा प्रकार थांबवण्याऐवजी आपली खिल्ली उडवून अपमान केला, अशी तक्रार संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकांनी तुमसर पोलीस ठाण्यात दिली आहे.

 

Leave a Comment