Monday, March 20, 2023

महिलांनी चक्क साडी नेसून खेळली कबड्डी, सोशल मीडियावर Video व्हायरल

- Advertisement -

छत्तीसगड : वृत्तसंस्था – विविध खेळांचे व्हिडिओ (playing kabbadi) आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहिलेच असतील. मात्र सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहे तो अनोखाच व्हिडिओ म्हणावा लागेल. हा व्हिडिओ पाहिल्यावर अरे वा असे म्हटल्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. हा व्हिडिओ छत्तीसगडमधील असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये काही महिला चक्क साडी नेसून कबड्डी खेळताना (playing kabbadi) दिसत आहेत.

- Advertisement -

महिलांची ही कबड्डी छत्तीसगड या ऑलम्पिक चा भाग (playing kabbadi) असल्याचे समोर आले आहे. छत्तीसगडच्या पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगडिया ऑलिम्पिक सुरू करण्यात आल्या असून, एवढेच नाही तर यात गिली दांडा ते पिटुल, लंगडी शर्यत, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच आणि गोट्या इत्यादी 14 प्रकारच्या प्रादेशिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ (playing kabbadi) आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तर याला चांगल्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.या महिलांचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती