‘मी अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्यानं विजय मिळवेन’; गांधी जयंतीला राहुल गांधींचा निर्धार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुरुवारी अटक करण्यात आल्यानंतर आज त्यांनी ‘अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्यानं विजय मिळवेन’ या शब्दांत गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे.

दरम्यान, गुरुवारी बहिण आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यासोबत हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना रस्त्यात अडवण्यात आलं होतं. पोलिसांकडून रस्त्यातच धक्काबुक्की आणि अटक करण्यात आलेल्या राहुल गांधींनी आज मागे हटणार नसल्याचंच सूतोवाच आपल्या या ट्विटमधून केलंय. ‘मी जगातील कुणालाही घाबरणार नाही… मी कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही. मी असत्यावर सत्यानं विजय मिळवेन आणि असत्याचा विरोध करताना सर्व कष्ट सहन करू शकेन’ गांधी जयतीच्या शुभेच्छा, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.

गुरुवारी अतिशय नाट्यपूर्ण घटनाक्रमात ५० वर्षीय राहुल गांधी आणि उत्तर पोलिसांचा आमना-सामना झाला होता. या दरम्यान राहुल गांधींना जोरदार धक्का लागल्यानंतर ते जमिनीवर कोसळले होते. या दरम्यान त्यांच्या हातालाही दुखापत झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाननं महामारी दरम्यान मोठ्या प्रमाणात कायद्याचं उल्लंघन करण्याचा आरोप करत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना ताब्यात घेतलं होतं.

यावेळी ‘तुम्ही मला अटक का करत आहात? कोणत्या आधारावर अटक करण्यात येतेय? मी कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलंय?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी अधिकाऱ्यांना केला. यावर ‘कलम १८८ नुसार सरकारी आदेशांची अवहेलना करण्याच्या आरोपाखाली अटक’ असल्याचं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment