सातारा | महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा गावच्या हद्दीत नदी संगम येथे एका कामगाराचा बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात आज रविवारी देण्यात नोंद देण्यात आली. सुरेशभाई फत्तेसिंग चौहाण (वय- 47 वर्षे, रा. वजेठीवाडी ता. बोरसदर जि. आणंद, राज्य- गुजरात सध्या रा. तापोळा ता.महाबळेश्वर जि.सातारा) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी दि. 21 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुरेशभाई चाैहाण दारूच्या नशेत तापोळा गावात फिरायला गेले होते. तापोळा नदी संगम (ता.महाबळेश्वर) येथे पाय घसरुन पाण्यात पडले. सुरेशभाई या कामगारास पोहता येत नव्हते. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला असावा.
तापोळा घटनेची फिर्याद महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत भौमिककुमार सतिशभाई पटेल (वय- 27 वर्षे रा. बोरसद भिंडीबाजार ता. बोरसदर जि. आणंद राज्य गुजरात सध्या रा. तापोळा ता.महाबळेश्वर जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. अधिकचा तपास महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे पो. हवा. मुलाणी करत आहेत.