अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार फटकेबाजी; एकाचवेळी साधला विरोधकांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज विधानसभा अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. “प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबू-टीबुची भाषा करत आहेत. वर्षावर जाण्यापूर्वी वाटीभर लिंबू सापडले होते. मला हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा मुख्यमंत्री असे म्हंटले. मीही आता वर्षभर घराबाहेर न पडलेला मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी ऑफर देतो. एकच सांगतो बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांनी गमावलाय,” अशी टीका शिंदे यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. ख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा.

अजित दादांकडून कालचे निर्णय झाले त्याचे स्वागत होईल असं वाटलं होतं. पण तुम्ही आमच्या भाषणावर किती टाळ्या झाल्या हे मोजत होते. दादांना वाटलं नव्हतं की एवढे मोठे आम्ही निर्णय घेऊ, आमच्या सरकारच्या कामाचा हा वेग त्यांनी पाहिला आहे, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

‘वर्षा’वर पाटीभर लिंब सापडली

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अडीच वर्षांत एका प्रकल्पाला मान्यता दिली. आम्ही 18 प्रकल्पांना मान्यता दिली. चुका सुधारल्यानंतर माणूस सुधारतो. आम्ही वर्षावर नंतर गेलो तर तिकडे ‘वर्षा’वर पाटीभर लिंब सापडली. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूची भाषा करु लागले. रेशीम बागेत गेल्यानंतर अनेकांनी आम्हाला हिणवलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं काम करायचं म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही, असंही ते म्हणाले.

मग त्यावेळी कोणती मस्ती होती? : मुख्यमंत्री

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आमदार हनुमान चालीसा वाचायला बसला तर त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं. त्यांच्या खासदार पत्नीलाही जेलमध्ये टाकलं. पत्रकार अर्णब गोस्वामी आणि राहुल कुलकर्णी यांना जेलमध्ये टाकलं. गिरीश महाजन यांचा पूर्ण कार्यक्रम केला होता. आमच्या सरसकट चौकशा लावण्याचं त्यावेळी पाप केलं होतं. आणि अजितदादा तुम्ही आम्हाला सांगता की, सत्तेची मस्ती नसावी मग त्यावेळी कोणती मस्ती होती?, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचा पाढाच वाचला…

सत्तेत आल्यानंतर आम्ही काय केले हे विचारले जाते, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेनी केलेल्या कामाचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, आम्ही राज्यात दिव्यांगांसाठी मंत्रालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिव्यांगांसाठी मंत्रालय करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे. सात कोटी लोकांना रेशनचं दिवाळीचा शिधा वाटप केला. चार वस्तू १०० रुपयांत दिला. चीनमध्ये कोविड आलंय. धानासाठी हेक्टरी १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला. याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार आहेत. त्यामुळं कोणालाही पैसे खायला मिळणार नाही.अतिवृष्टीग्रस्तांना पाच हजार कोटींची मदत केली. राज्यात ७०० बाळासाहेब ठाकरे रुग्णालये सुरू करतोय. मुंबईत ५२ दवाखाने सुरू केले. ठाण्याला त्याची सुरुवात केली. त्यातून सर्वसामान्यांना मोफत औषध, मोफत ट्रीटमेंट मिळणार आहे. १४७ प्रकारच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली. शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. ७५ हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतल्याची माहीत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.