हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 4 फेब्रुवारी… दरवर्षी आजचा दिवस हा जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day ) म्हणून साजरा केला जातो. सर्वसामान्यांना कॅन्सरच्या धोक्यांची जाणीव करून देणे, कर्करोगाची लक्षणे आणि उपाय याबाबत माहिती देणे हा त्यामागचा उद्देश आहे. ब्लड कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, फुफुसाचा कॅन्सर असे कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. एकदा कॅन्सर झाल्यानंतर त्यावर मात करून आयुष्यात पुन्हा उभा राहणं हे काही साधं सोप्प काम नाही. त्यामुळे वेळीच सावध होऊन कॅन्सर होऊच नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे
दरवर्षी कर्करोग दिनानिमित्त नवीन थीम प्रसिद्ध केली जाते. कर्करोगाची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल लोकांना माहिती देणे हा त्याचा उद्देश आहे. जागतिक कर्करोग दिन 2023 ची थीम “क्लोज द केयर गैप” (Close The Care Gap) आहे. तुम्ही सुद्धा आजच्या या कॅन्सर दिनानिमित्त हौसला आणि जोश वाढवणारे कोट्स शेअर करून कर्करोगाविरुद्धचा आपला लढा आणखी मजबूत करूया. त्यापूर्वी जाणून घेऊयात कॅन्सरची नेमकी कारणे आणि लक्षणे काय आहेत.
कॅन्सर होण्याची मुख्य कारणे –
धूम्रपान किंवा चघळण्याच्या स्वरूपात (World Cancer Day ) तंबाखू आणि तंबाखूशी संबंधित पदार्थांच्या सेवनामुळे फुफ्फुस आणि तोंडाचा कॅन्सर होतो. तसेच जास्त अल्कोहोलच्या सेवनामुळे यकृताचा कॅन्सर होण्याच्या धोका अनेकांमध्ये दिसतो.
कॅन्सरची लक्षणे – World Cancer Day
तोंडावर वारंवार व्रण उटणे, त्वचेखाली गाठ जाणवणे, आवाजात बदल वाटणे, सतत इन्फेक्शन होणे, लघवीच्या सवयी बदलणे, अधूनमधून लघवी होणे, अनियमित रक्तस्त्राव, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, (World Cancer Day) अन्न गिळण्यास त्रास होणे हि कॅन्सरची सामान्य लक्षणे आहेत. टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची पातळी वाढवणाऱ्या हार्मोन्समुळे प्रोस्टेट कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सरचा धोका वाढतो.
या कोट्सद्वारे लोकांना जागरूक करा-
आता गुटखा नाही खायचा (World Cancer Day)
फक्त कॅन्सरला दूर पळवायचा
वेळेत करा कॅन्सरवर इलाज
नाहीतर कोणी नाही ऐकणार तुमचा आवाज
तंबाखूशी नातं तोडूया
निरोगी आयुष्याशी नातं जोडूया
तंबाखू पानामुळे आरोग्याला नुकसान
याच्या सेवनाने जाईल प्राण