हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य,त्याग आणि पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील वढु बुद्रुक येथे जागतिक दर्जाचे, भव्य प्रेरणादायी, स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आज विधानसभेत माहिती दिली.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक, अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे भव्य जागतिक दर्जाचे स्मारक उभे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पुणे जिल्हातील तुळापूर गावात संभाजी महाराजानी आपला देह ठेवला त्या तुळापूर पासून जवळ शिरूर तालुक्यातील वढु बुद्रुक गावात त्यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं
हे स्मारक फक्त पर्यटना साठी असणार नाही तर छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्त्वाला वंदन, नमन करण्यासाठी आणि प्रत्येकाला प्रेरणादायी आणि स्पुर्ती दायी ठरेल असे अजित पवार यांनी म्हंटल. संभाजी महाराज यांचे हुतात्म हे महाराष्ट्रासाठी गौरवशाली आहे त्यांच्या हुतात्म्यामुळे स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याची भावना तीव्र झाली आणि मावळा पेटून उठला आणि लढण्यासाठी सज्ज झाला असेही अजित पवार यांनी म्हणलं