World Cup 2023 : सर्वात मोठी भविष्यवाणी!! कोण जिंकणार यंदाचा वर्ल्डकप

World Cup 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2023) थरार सुरु झाला आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात होत असलयाने नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. हा वर्ल्डकप कोण जिंकणार याबाबत नवनवीन अंदाज बांधले जात आहेत. यामध्ये यजमान भारत, गतविजेता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचं नाव घेतलं जात आहे. त्यातच आता यंदाची विश्वचषक स्पर्धा कोण जिंकणार याबाबत मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया….

ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांची भविष्यवाणी : World Cup 2023

ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी विश्वचषक विजेत्याबाबत (World Cup 2023) भाकीत केलं आहे. ग्रीनस्टोन लोबो यांनी 2011, 2015 आणि 2019 क्रिकेट विश्वचषक विजेत्या  संघांबाबतही भाकीत केलं होतं, जे अचूक ठरलं होतं. त्यामुळे त्यांनी याही वेळेस केलेल्या भाकिताची जोरदार चर्चा समाज माध्यमातून होताना दिसत आहे. ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी भविष्यवाणी करत म्हटलं आहे की,1987 मध्ये जन्मलेला कर्णधार भारतात होणारा पुरुष एकदिवसीय विश्वचषक जिंकेल. 1986 मध्ये जन्मलेले खेळाडू आणि कर्णधारांपेक्षा 1987 मध्ये जन्मलेल्या खेळाडूंकडून अलीकडच्या काळातील मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळालं आहे, असं त्यांनी नमूद केलं.

रोहित व शाकिबचा जन्म 1987 चा  :

आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये (World Cup 2023) खेळणाऱ्या दोन प्रमुख संघांच्या कर्णधारांचा जन्म हा 1987 मध्ये झालेला असून त्यामध्ये बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांचे नाव आहे. यातील बांगलादेशची सध्याची स्थिती पाहता तो संघ वर्ल्डकप जिंकेल अशी शक्यता अजिबात नाही. परंतु भारतीय संघ मात्र प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यातच आता ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांच्या या भविष्यवाणी मुळे भारतीय चाहते खुश असतील यात शंकाच नाही.