हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून जगभर सामान्यांपासून ते व्हीआयपी लोकांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) प्रमुख टेडरोस अदनोम घेबियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी स्वतःला क्वारन्टाईन केले आहे. गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने टेडरोस यांनी होम क्वारन्टाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. टेडरोस यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
”मी करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्या कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाइनमध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे.”
I have been identified as a contact of someone who has tested positive for #COVID19. I am well and without symptoms but will self-quarantine over the coming days, in line with @WHO protocols, and work from home.
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 1, 2020
आपण सर्वांनी आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपण करोना संसर्गाची साखळी तोडू शकू व करोनावर मात करू शकणार आहोत. तसेच, यामुळे आरोग्य प्रणालीचे रक्षणही करू शकणार आहोत. असंही टेड्रोस यांनी म्हटलं आहे.
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. एकूण बाधितांची संख्या 4,68,04,423 इतकी झाली आहे. यापैकी 12,05,044 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. तर 3,37,42,731 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’