जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्राही झाले खुश

e bike anand mahindra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IIT मुंबईचे विध्यार्थी नेहमीच कमाल करतात. आता ह्याहीवेळी IIT मुंबईच्या विद्यार्थ्याने जगातील पहिली दुमडू शकेल अशी पहिली फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. हॉर्नबॅक X -1 असे या सायकलचं नाव असून देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद  महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून या सायकलचे काही फोटो शेअर केले तसेच त्यांनी या सायकल वरून एक फेरफटका सुद्धा मारला. आनंद महिंद्रा ही फोल्डेबल सायकल पाहून भलतेच खुश झालेलं पाहायला मिळालेत.

आनंद  महिंद्रा यांनी हॉर्नबॅक X -1 या IIT मुंबईच्या विध्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या नवीन स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केल्याची माहिती याच दरम्यान दिली आहे. त्यामुळे संबंधित हॉर्नबॅक स्टार्टउपला भविष्यात उत्तम मागणी  मिळू शकते. दुमडता येण्याच्या पद्धतीमुळे ही इलेक्ट्रिक सायकल कुठेही ठेवता येणे सहज  शक्य होणार आहे. कारमध्ये सुद्धा फोल्ड करून इलेक्ट्रिक सायकल सहजतेने ठेवता येते हे आनंद महिंद्रा यांनी दाखवून दिले.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल कि, IIT मुंबईच्या विध्यार्थ्यांनी अभिमान वाटावा अशी जगातील पहिली फोल्ड होणारी इलेक्ट्रिक सायकल बनवली. ही इलेक्ट्रिक सायकल इतर फोल्डेबल बाइक्सपेक्षा फक्त 35% अधिक कार्यक्षम बनवत नाही तर बाइकला मध्यम गतीपेक्षा अधिक स्थिर करते. आणि ही एकमेव सायकल आहे जी फोल्ड केल्यानंतर उचलावी लागत नाही. ऑफिस कंपाऊंडभोवती फिरण्यासाठी मी स्वतः या हॉर्नबॅक X1 वरून फेरफटका मारला असेही आनंद महिंद्रा यांनी म्हंटल.

हॉर्नबॅक X1 45,000 रुपयांत

हॉर्नबॅक X1 रु. 45,000 च्या प्रास्ताविक किमतीत लॉन्च करण्यात आली आहे आणि त्याच्या अद्वितीय वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, यामध्ये 250W, 36 Nm मोटरसह 36V, 7.65Ah बाहेर काढता  येणारी बॅटरी मिळते. या इलेक्ट्रिक सायकलची बॅटरी 3 तासांच्या आत फुल्ल चार्ज होऊ शकते, तसेच एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर 45 किलोमीटर पर्यंत रेंज सुद्धा देते. या सायकलचे टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतकं आहे. या सायकलला फोल्ड करणं आणि पुन्हा मिटवणे अतिशय सोप्प आहे, त्यामुळे तुमचा वेळी वाया जाणार नाही. हॉर्नबॅक X1 अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, जसे की स्मार्ट LCD डिस्प्ले जो रायडरचा वेग, बॅटरी पातळी आणि इतर महत्त्वाची माहिती दर्शवतो.