चिंताजनक! जिल्ह्यात 47 कोरोनाबाधितांची नव्याने वाढ, दोघांचा मृत्यू

Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्ह्यात 47 कोरोना बाधितांची नव्याने भर पडली आहे. तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यात घाटी रुग्णालयात कबाडीपुरा येथील 59 वर्षीय पुरुष, तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 70 वर्षीय रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 35 जणांना मनपा 9, ग्रामीण 26 सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एक लाख 43 हजार 255 कोरोनाबंधित बरी होऊन घरी परतली आहेत. एकूण 47 रुग्णांची नव्याने भर पडल्याने एकूण कोरोनाबंधित रुग्णांची संख्या एक लाख 47 हजार 19 झाली आहे. आतापर्यंत एकूण तीन हजार 475 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 289 रुग्णावर उपचार सुरु आहे.

दरम्यान, मनपा हद्दीत 17 रुग्ण आढळले. यात दशमेशनगर 1, दिपीएस संकल 1, गारखेडा परिसर 3, कडा भवन 1, शिवाजी नगर 1, सातारा परिसर 2, ज्योती नगर 1, मुकुंदवाडी 1, अन्य 6 तर ग्रामीण भागात गंगापूर येतील 10, कन्नड 2, सिल्लोड 2, वैजापूर 13, पैठण येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. 14 हजार नागरिकांचे लसीकरण जिल्यामध्ये सोमवारी 14 हजार 781 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 11 हजार 371 तर शहरातील 3 हजार 410 जणांचा समावेश आहे. 19 जुलैपर्यंत 10 लाख 25 हजार 950 जणांचे कोविड लसीकरण झाले आहे.