हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात प्रथमच होत असणाऱ्या महिला आयपीएल (WPL 2023 Auction) साठी आज खेळाडूंची लिलावप्रक्रिया सुरु आहे. यावेळी रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिला आपल्या संघात सामील करून घेतले. तब्बल 3.40 रुपयांसह RCB च्या संघाने स्मृतीला संघात घेतलं. आत्तापर्यंत पार पडलेल्या लिलावादरम्यान स्मृती मानधना सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.
Fierce bidding battle between Mumbai Indians & Royal Challengers Bangalore for Smriti Mandhana #WPLAuction
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2023
स्मृती मानधनाला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि आणि आरसीबीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर शेवटी आरसीबीने ही बोली जिंकली आणि मानधनाला संघात घेतलं. स्मृती मानधना RCB ची कर्णधार पदाची सुद्धा मुख्य दावेदार असू शकते. स्मृती मानधनाचा अनुभव RCB च्या संघासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
स्मृती मानधना ही जगातील सर्वोत्तम T20 फलंदाजांपैकी एक आहे. तिने आत्तापर्यंत ११२ टी-२० आपल्या बॅटने 27.32 च्या सरासरीने 2651 धावा केल्या आहेत. यामध्ये तिने 20 अर्धशतकेही झळकावली आहेत. याशिवाय महिला बिग बॅश लीग आणि द हंड्रेडमध्येही खेळली आहे.