WPL Final 2024 : आज रंगणार महिला IPL चा अंतिम सामना; दिल्ली Vs बंगळुरूमध्ये हाय वोल्टेज लढत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

WPL Final 2024 : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज महिला आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात हा सामना होणार असून यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करतील. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा रात्री ७. ३० ला हा हाय वोल्टेज मुकाबला होणार आहे. RCB चा संघ प्रथमच या लीगच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे तर दिल्ली कॅपिटल्स हा सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचणारा संघ ठरला आहे.

कोणता संघ आहे मजबूत- WPL Final 2024

दोन्ही संघाची तुलना केल्यास कागदावर तरी दिल्लीचा संघ आरसीबीच्या संघापेक्षा काहीसा सरस दिसत आहे. मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा संघाला नेहमीच आक्रमक अशी सलामी देत आहेत, सुरुवातीलाचा दोघीही प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव टाकत आहे. त्याचा फायदा बाकी फलंदाजांना सुद्धा होत आहे. मधल्या फळीत जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी सारख्या अनुभवी खेळाडू आहेत. तर अष्टपैलू खेळाडू मारिझान कॅप आणि जेस जोनासनमुळे दिल्लीच्या संघाचा समतोल साधला आहे. याशिवाय दिल्लीकडे शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी यांच्या रूपाने घातक गोलंदाजांची फौज आहे.

दुसरीकडे आरसीबीच्या संघाने अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करुन अंतिम फेरीत धडक मारली आहे. बंगळुरूच्या संघात स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन, एलिस पेरी यांच्यासारखे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. या तिघींना क्रिकेटचा प्रचंड अनुभव असून हाच अनुभव आजच्या अंतिम सामन्यात (WPL Final 2024)आरसीबीच्या कामी येऊ शकतो. विकेटकिपर रिचा घोषणे अनेक वेळा संघासाठी उपयुक्त कामगिरी करत आपलं महत्व सिद्ध केलं आहे. याशिवाय आरसीबीकडे सोफी मोलिनक्स, रेणुका सिंग, श्रेयंका पाटील, शोभना आशा, श्रद्धा पोखरकर असा गोलंदाजीचा ताफा असून दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्याचे मोठं आव्हान त्यांच्यावर असणार आहे.