मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 3 पत्रे लिहिली, भेटीसाठी वेळही मागितली, परंतु..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा खासदार संभाजीराजे भोसले लावून धरला आहे. सरकार मराठा आरक्षण प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील आणि विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भात खासदार संभाजीराजे भोसले यांनीही सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी काय पत्रव्यवहार झाला, भेटीची वेळ मागितली होती का? असा प्रश्न संभाजीराजेंना विचारण्यात आला होता. त्यावर संभाजीराजेंनी एक खुलासा केलाय.

मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान मोदींच्या कानावर टाकला का? या प्रश्नाचं उत्तर देताना,संभाजीराजेंनी यांनी मोदींना तीनवेळा पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना सोबत घेऊन मी पंतप्रधानांना भेटणार आहे, त्यासाठी मी मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती. पण, मला अद्याप भेटीची वेळ मिळाली नाही. कदाचित, कोरोनाचं संकट असल्यामुळे एवढ्या सर्व खासदारांना एकत्र भेटणे शक्य नसल्याने तुर्तास भेट देण्यात आली नसेल, असे संभाजीराजेंनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटले. तसेच, आजपर्यंत मोदींना 3 पत्रे पाठवली आहेत, त्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे, असेही संभाजीराजेंनी म्हटले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षण स्थगितीवर आता चार आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. या सुनावणीला सरकारी वकील हजर नव्हते, त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावरुन, खासदार संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारी वकील कुठे आहेत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातो आणि तिथे वकील उपस्थित नसतात हे दुर्देव आहे, गंभीर आहे. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जिथे कुठे असतील, त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करण्याची गरज आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment