हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | WWE सुपरस्टार ग्रेट खली आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. खलीने आज दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने कृषी कायद्यासह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी खलीने केली आहे. सर्वांनी शेतकऱ्यांसोबत उभं राहावं, जेणेकरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मजबूर होईल”, अशी विनंती खलीने केली
सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलो आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं खलीने म्हटलं आहे. यासंदर्भातील खलीचा एक व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.शेतकऱ्यांकडून धान्य कमी किमतीत विकत घेतल जाईल आणि ते सामान्य माणसाला 200 च्या हिशोबाने विकलं जाईल. यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याचं खलीने म्हटलं आहे.
सर्वांनी शेतकऱ्यांसोबत उभं राहावं, जेणेकरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मजबूर होईल”, अशी विनंती खलीने केली. त्याचबरोबर “सरकारची गाठ आता पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत आहे. मी सहा महिन्यांचं राशन सोबत घेऊन आलो आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथेच ठाण मांडून राहणार”, असा इशारा खलीने दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’