हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवनवीन मोबाईल खरेदी (Xiaomi 12 Lite 5G) करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जगातील दुसरी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा नवा मोबाइल Xiaomi 12 Lite 5G लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि यामधील खास फीचर्स याबाबत….
6.55-इंच डिस्प्ले-
शाओमी 12 Lite 5G ला 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.55-इंच फुल HD AMOLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनचे डायमेंशन 159.3×73.7×7.29mm आणि वजन 173 ग्रॅम आहे. मोबाईल मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.
अन्य फीचर्स-
शाओमी 12 लाईट 5G या स्मार्टफोनला स्नॅपड्रॅगन 778G SoC प्रोसेसर वापरला जातो. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा (Xiaomi 12 Lite 5G) स्मार्टफोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर आधारित आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी, ड्युअल-बँड 2.4GHz/5GHz Wi-Fi आणि ब्लूटूथ 5.2 यांचा समावेश आहे.
108MP कॅमेरा- (Xiaomi 12 Lite 5G)
शाओमी 12 लाईट 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 108-मेगापिक्सेल चा प्रायमरी कॅमेरा आहे. आठ-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि दोन-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300mAh ची बॅटरी आहे.
किंमत-
या मोबाईलची (Xiaomi 12 Lite 5G) किंमत त्याच्या स्टोरेज वर अवलंबून असेल. Xiaomi 12 Lite तीन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो. त्यानुसार 6GB RAM + 128GB स्टोरेजची अंदाजे किंमत 31,600 रुपये असू शकते. 8GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत अंदाजे 35,600 रुपये असू शकते तर 8GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत सुमारे 39,600 रुपये असण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :
Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही
Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत
OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत
Google Pixel 6a : भारतात लॉंच झाला गुगल Pixel 6a; किंमत आणि फीचर्स बद्दल जाणून घ्या
iQOO 10 Pro : फक्त 12 मिनिटांत चार्जिंग फुल्ल; iQOO चा नवा स्मार्टफोन बाजारात छाप पाडणार