‘या’ कंपनीने सादर केला एक धमाकेदार प्लॅन, 69 रुपयांमध्ये मिळणार मोफत कॉल आणि 7 जीबी डेटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन प्लॅन आणत असते. आपल्या या नवीन प्लॅन्समध्ये कंपनी युजर्सला नेहमीच जास्तीत जास्त डेटा आणि मोफत कॉलिंगचा फायदा देण्याचा प्रयत्न करत असते. आताही जिओने आपला 69 रुपयांचा स्वस्तातला प्लॅन आ[लय मोबाईल युजर्ससाठी लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ही युजर्सला अनलिमेटेड कॉलिंगसह डेटा देखील मिळत आहे. चला तर मग जाणून घेउयात काय आहेत नवीन प्लॅन:

काय आहे 69 रुपयांचा हा प्लॅन –

रिलायन्स जिओ कंपनीच्या या 69 रुपयांच्या प्लॅनची वैधता ही 14 दिवस असून, या प्लॅनमध्ये युजर्सला 7 जीबी पर्यंत डेटा, जिओ टू जिओ मोफत कॉलिंग आणि इतर नेटवर्कवरील कॉलिंगसाठी 250 मिनिटे मिळतील. या प्लॅनमध्ये युजर्सला 25 एसएमएस देखील मिळतील. सोबतच युजर्सला जिओ अ‍ॅप्सचे फ्री कॉम्प्लिमेंट्री स्बस्क्रिप्शनही मिळेल.

काय आहे 49 रुपयांचा हा प्लॅन –

रिलायन्स जिओचा हा आणखी एक स्वस्तातला प्लॅन असून, या प्लॅनची वैधता देखील 14 दिवस आहे. यामध्ये युजर्सला 2 जीबी डेटा, जिओ टू जिओ मोफत कॉलिंग तसेच दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलिंगसाठी 250 मिनिटे आणि 25 एसएमएस देखीलमिळतात.

काय आहे 75 रुपयांचा हा प्लॅन –

रिलायन्स जिओच्या या प्लॅनचा कालावधी हा 28 दिवसांचा असून, यात युजर्सला 3 जीबी पर्यंतचा डेटा मिळतो. याशिवाय जिओ टू जिओ मोफत कॉलिंग, दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलिंगसाठी 500 मिनिटे आणि 50 एसएमएस मिळतात. याशिवाय जिओ अ‍ॅप्सचे फ्रीमध्ये कॉम्प्लिमेंट्री स्बस्क्रिप्शनही मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.