सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. पाचगणी, महाबळेश्वर भागात वाहनांची संख्या वाढली असून अपघातांमध्येही वाढ झाली आहे. आज शहरापासून चार किमी अंतरावर एका वेगवान दुचाकीस्वाराने रस्त्याकडेच्या झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
महाबळेश्वर शहरापासून अंदाजे चार किमी अंतरावरदुचाकी झाडावर धडकून झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला आहे. महाबळेश्वर शहरापासून अंदाजे चार किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर कॅनॉट पीक पॉईंट परिसरात दुचाकी झाडावर धडकून झालेल्या अपघातात क्षेत्र महाबळेश्वर येथील ऋषिकेश विलास शिंदे (वय २०) हा युवक जागीच ठार झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वर येथील रे गार्डन वाहनतळामध्ये ऋषिकेश शिंदे हा युवक कामाला होता. रात्री अकरा वाजता कामावरून तो क्षेत्र महाबळेश्वर येथे घरी जेवण्यासाठी गेला होता. रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा रात्री नाईट ड्युटीवर क्षेत्र महाबळेश्वरहून महाबळेश्वरच्या दिशेने येत असताना कॅनॉट पीक पॉईंट पासून काही अंतरावर मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेला जाऊन त्याची यामाहा R15 एम एच ११ डीजी ६०११ ही दुचाकी थेट झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर ऋषिकेशला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.