गायीला वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅनचा भीषण अपघात

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये गायीला वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅनचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पिक अप व्हॅनमधील क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.संबंधित पिक अप व्हॅन वरोऱ्याच्या दिशेने निघाली असताना वाटेत गाय आडवी आली, त्यावेळी गायीला धडकण्यापासून वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅन चालकाने जोरदार ब्रेक मारला. त्यामुळे ड्रायव्हरचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि पिक अप गाडी रस्त्याच्या दुभाजकावर चढून पलटी झाली. या भीषण अपघातात पिक अप व्हॅनचा वाहक जखमी झाला आहे, तर चालक सुखरुप आहे.

नेमका कशा प्रकारे घडला अपघात ?
वणी-घुग्गुस मार्गावरून एम एच 34 ए व्ही 3135 या नंबरची पिकअप गाडी वरोऱ्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी अचानक रस्त्यात गाय आडवी आल्याने तिला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक लावला. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हि पिक अप गाडी रस्त्याच्या दुभाजकावर चढून पलटी झाली. या अपघातात वाहक जखमी झाला आहे तर चालक सुखरूप वाचला आहे.

जखमी वाहकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मोकाट गुरा-ढोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यावर काहीतरी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.