येरवडा कारागृहातील ८६७ कैदी उपोषणाला बसण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा व्हायरसचा संसर्ग धोका लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने देशातील कारागृहातील कैद्यांना ६ महिन्यांच्या पॅरोलवर सोडण्याचे आदेश जेल प्रशासनाला दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट असतानाही जेल प्रशासन आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप येरवडा कारागृहातील कैद्यांनी केला आहे. त्यामुळं आता येरवडा कारागृहातील ८६७ कैदी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लहान गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेले, तसेच जय कैद्यांचे खटले नायायालयात सुरु आहेत अशांना ६ महिन्यांच्या पॅरोलवर सोडण्याचे आदेश जेल प्रशासनाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या एक समिती गठीत करून ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन काही दिवस उलटून सुद्धा जेल त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचं येरवडा कारागृहातील कैद्यांचं म्हणणं आहे.

त्यामुळं, आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी येरवडा कारागृहातील ८६७ कैदी आता उपोषणाला बसायच्या तयारीत आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर राज्य सरकार आणि जेल प्रशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

Breaking! महाराष्ट्रात एकूण ३३५ कोरोनाग्रस्त; एकट्या मुंबईत ३० नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा