नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील येस बँके (Yes Bank) ने फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) वरील व्याज दरात बदल केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँक 4% ते 7.5% व्याज दर देत आहे. हा व्याज दर सर्वसामान्यांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीसाठी आहे. येस बँक आपल्या सर्व ग्राहकांना अल्पावधीत कमीतकमी 7 दिवसांपासून ते दीर्घ मुदतीच्या 10 वर्षांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिटची (FD) सुविधा देते. कोरोना महामारीमुळे बँकांचे फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर अलिकडच्या काळात लक्षणीयरित्या घटले आहे.
8 फेब्रुवारीपासून नवीन दर लागू होतील
बँकेने केलेला बदल 8 फेब्रुवारी 2021 पासून सर्व फिक्स्ड डिपॉझिटसवर लागू झाले आहेत. सर्व फिक्स्ड डिपॉझिट योजनांवर नियमित ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना कमीतकमी 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन बँक 4% ते 7.5% व्याज दर देत आहे.
येस बँकेचे नवीन एफडी दर (2 कोटीपेक्षा कमी) असे आहेत.
7 दिवस ते 14 दिवस – 3.5%
15 दिवस ते 45 दिवस – 4%
46 दिवस ते 90 दिवस – 4.50%
3 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी – 5%
6 महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी – 5.50%
9 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.75%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 6.25%
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 6.50%
3 वर्षे ते 10 वर्षे – 6.75%
ज्येष्ठ नागरिकांना 0.5% जास्त व्याज
ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांपेक्षा कमी जुन्या एफडी योजनांवर 0.5% अधिक व्याज मिळेल. त्याच वेळी, 3 वर्षांवरील एफडीला 0.75% अधिक व्याज मिळेल. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 4% आणि 10 वर्षांच्या एफडीवर 7.5% मिळतील.
अशा प्रकारे हे बँक एफडी खाते उघडा
>> येस बँकेत एफडी खाते उघडण्यासाठी आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले खाते उघडता येईल.
>> त्यानंतर मेनूमधील फिक्स्ड डिपॉझिट पर्याय निवडा.
>> आता तुम्हाला जी एफडी उघडायची आहे आणि पुढे जायचे आहे ते निवडा.
>> यानंतर तुमची अनामत रक्कम भरल्यानंतर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ज्येष्ठ नागरिक पर्याय निवडा.
>> आता तुम्हाला एफडी करायची असेल तो कालावधी निवडा आणि सबमिट क्लिक करा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.