हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Yes Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे.
5 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू
Yes Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 5 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदला नंतर आता बँकेकडून 7 दिवस ते 120 महिन्यांच्या FD वर सर्वसामान्यांसाठी 3.25% ते 6.75% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.75% ते 7.50% व्याजदर देत आहे. आता सर्वसामान्यांना एक वर्ष ते 3 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7% व्याज मिळणार आहे.
Yes Bank च्या एफडीचे नवीन दर
या बदलानंतर आता Yes Bank 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर 3.25%, 15 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3.70%, 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.10%, 91 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 4.75% आणि 181 दिवस ते 271 दिवसांपर्यंत 5.50% व्याज दर देत आहे. तसेच येस बँक आता 272 दिवस ते 1 वर्षाच्या FD वर 5.75%, 1 वर्ष ते 36 महिन्यांच्या FD वर 7% आणि 36 महिने ते 120 महिन्यांच्या FD वर 6.75% व्याज दर देईल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.yesbank.in/personal-banking/yes-individual/deposits/fixed-deposit
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे