हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank: महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. यामध्ये आता Yes Bank चे नाव देखील सामील झाले आहे. कारण बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
21 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 21 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. Yes Bank ने FD वरील व्याजदर 0.25 टक्क्यांवरून 0.50 टक्के केला आहे. आता बँकेने 25 महिन्यांसाठीच्या FD वरील व्याजदरात सुधारणा केली आहे. तसेच आता बँक 36 महिन्यांच्या FD वर 8% व्याज देत आहे.
Yes Bank च्या एफडीचे नवीन दर
कालावधी सामान्य नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी
7 दिवस ते 14 दिवस: 3.25% 3.75%
15 दिवस ते 45 दिवस: 3.70% 4.20%
46 दिवस ते 90 दिवस: 4.10% 4.60%
91 दिवस ते 180 दिवस: 4.75% 5.25%
181 दिवस ते 271 दिवस: 6.00% 6.50%
272 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: 6.25% 6.75%
1 वर्ष ते 15 महिने: 7.25% 7.75%
15 महिन्यांपेक्षा कमी 35 महिन्यांपेक्षा कमी: 7.50% 7.71%
35 महिन्यांपेक्षा कमी 1 दिवस 36 महिन्यांपेक्षा कमी: 7.50% 8.00%
36 महिने ते 120 महिने: 7.00% 7.75%
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.yesbank.in/personal-banking/yes-individual/deposits/fixed-deposit
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
उन्हाळ्यातील रखरखत्या उन्हात ‘हा’ छोटासा fridge भागवेल आपली तहान !!!
Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी !!! देशभरात नवीन नियम लागू