व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजपची सेफ खेळी!! योगी आदित्यनाथ ‘या’ मतदारसंघातुन निवडणूक लढवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदारसंघातुन निवडणूक लढवतील हे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे योगींनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. भाजपने आज 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, याबाबत उत्सुकता होती. ते यावेळी अयोध्या किंवा मथुरेतून लढतील असे बोलले जात होते. उत्तरप्रदेशात भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्याने योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. योगी आदित्यनाथ हे सुद्धा यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपने पुन्हा एकदा गोरखपूरमधूनच योगी आदित्यनाथ यांना तिकीट देऊन सर्वांना धक्का दिला आहे.

भाजपची सेफ खेळी-

गोरखपूर मतदारसंघ हा मुख्यमंत्री योगींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने सगळ्यांशी विचारविनिमय करून योगींना गोरखपूरमधून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.