किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट; दोघांत तब्बल दीड तास चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी अभिनेते किरण माने याना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढुन टाकल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. राजकीय विषयांवर भाष्य केल्यामुळेच मला काढून टाकण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पवारांसोबत त्यांनी तब्बल दिड तास चर्चा केली.

माझी बाजू मी शरद पवार यांच्या समोर मांडली आहे. माझ्यावर जो अनन्या झाला आहे याबाबत शरद पवार यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटलं म्ह्णून मी आज येऊन भेट घेतली असे किरण माने यांनी सांगितलं. शरद पवार यांनी माझी बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली आणि आमच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. मला आशा आहे मला न्याय मिळेल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पण यानंतर भेटणार आहे.भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचीही भेट आपण घेणार आहोत असे किरण माने म्हणाले. उदयनराजे सध्या गोव्यात असल्याने आपली भेट झाली नाही असे ते म्हणाले.

You might also like