योगी सरकार मुंबईत कार्यालय सुरु करणार; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कार्यालय सुरु करण्याचा मोठा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश मधील महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांची सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जातील तसेच यूपीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील जे नागरिक नोकरी, व्यवसायासाठी मुंबईत दीर्घकाळ वास्तव्य करत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठीच मुंबईत कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती योगी सरकारकडून देण्यात आली आहे. कोणतेही संकट आल्यास लोकांना सुरक्षितपणे परत आणणे तसेच लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार काम उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालय काम करेल, असे योगी सरकार कडून सांगण्यात आले आहे.

यूपी सरकारच्या या उपक्रमामुळे मुंबईत राहणाऱ्या त्या लाखो यूपी रहिवाशांच्या हिताचे फक्त रक्षणच होणार नाही, तर त्यांना त्यांच्या मूळ राज्यात गुंतवणूक करून इथं जोडण्याची उत्तम संधी मिळेल आणि तिथल्या समृद्धीला हातभार लागेल.

मुंबईत 50-60 लाख उत्तर भारतीय आहेत-

एका अंदाजानुसार, मुंबईच्या 1 कोटी 84 लाख लोकसंख्येमध्ये उत्तर भारतीय वंशाचे सुमारे 50 ते 60 लाख लोक राहतात, ज्यामध्ये सर्वात जास्त लोक यूपीमधून येतात. मुंबईत उद्योग, सेवा क्षेत्र, किरकोळ व्यापार, वाहतूक, खाद्यपदार्थ व्यवसाय, कारखाना किंवा गिरणी अशा अनेक क्षेत्रात उत्तर प्रदेशातील लोकांचे उल्लेखनीय योगदान आहे. मुंबईतील रहिवाशांच्या जीवनात अनेक क्षेत्रे मोठी भूमिका बजावतात. उद्योग आणि स्टार्टअपच्या क्षेत्रातही उत्तर प्रदेशातील रहिवाशांनी मुंबईत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. माहिती तंत्रज्ञान, चित्रपट, दूरदर्शन, उत्पादन, वित्त, अन्न प्रक्रिया इत्यादी उद्योगांमध्ये यूपीच्या उद्योजकांचे मोठे योगदान आहे.

Leave a Comment