नवी दिल्ली । जेव्हा आपण ATM मधून पैसे काढून घेतो तेव्हा असे बर्याच वेळा घडते कि फाटलेल्या नोटा आपल्या हातात येतात. ज्यानंतर आपण अस्वस्थ होतो आणि हे साहजिकच आहे कारण बाजारात अशा नोटा चालविणे फारच अवघड होते. मात्र आता आपल्याकडे अशा खराब नोटा आल्या तर आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आता RBI ने लोकांच्या समस्या लक्षात घेऊन समस्येचे निराकरण करण्याचा मार्ग शोधला आहे. यासाठी काय पद्धत आहे ते जाणून घ्या …
नोटे बद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लागेल
जर आता ATM मधून फाटलेली नोट बाहेर आली तर आपण बँकेशी संपर्क साधू शकता. बँकेत ती नोट बदलण्यासाठी एक फॉर्म भरावा आणि सबमिट करावा लागेल. यात वेळ, तारीख आणि कोणत्या ATM मधून पैसे काढले गेले याचा तपशील द्यावा लागेल. यासह तुम्हाला पैसे काढल्याची स्लिपही द्यावी लागेल. जर ATM मधून स्लिप बाहेर आली नसेल तर आपल्याला आपल्या मोबाइलचा मेसेज दाखवावा लागेल.
RBI चा नियम काय आहे?
RBI च्या नियमांनुसार आपण ATM मधून मिळालेली फाटलेली नोट थेट बँकेत घेऊन जाऊन बँकेच्या कर्मचार्यांना सांगा की, ही नोट तुमच्या ATM मधून निघाली आहे आणि तुम्ही ती चेंज करा. यावर जर बँक आपली नोट घेत नसेल तर आपण इतर पद्धती देखील अवलंबू शकता. रिझर्व्ह बँकेच्या एक्सचेंज करन्सी नियम 2017 नुसार जर तुम्हाला ATM मधून फाटलेली नोट मिळाली असेल तर ती नोट दुसर्या नोटसह बदलणे ही बँकेची जबाबदारी आहे. त्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
नियमांनुसार कोणतीही बँक ATM मधून फाटलेली नोट स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. जर बँकांनी या नियमांचे उल्लंघन केले तर बँकेच्या कर्मचार्यांवर कारवाई केली जाऊ शकते आणि त्यासह जबरदस्त दंडही आकारला जाईल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा