आई नव्हे तू वैरीण ! सावत्र आईनेच मुलीला तीन वेळेस विकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या वाळूज महानगर परिसरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र आई, काका आणि मावशी या नातेवाईकांनीच आपल्या मुलीला एकदा सोडून तीनदा वेगवेगळ्या ठिकाणी विकले. लाखो रुपये घेऊन ज्यांच्या ताब्यात मुलगी दिली त्या सगळ्यांनी तिच्यावर अत्याचार करून तिला सोडुन दिले. या कंटाळून त्या मुलीने आपल्या बहिणीकडे पळ काढला.

भेटलेल्या माहितीनुसार पीडित ती वाळूज महानगर मध्ये तिची सावत्र आई आणि वडील सोबत राहत होती. 2018 मध्ये त्यांनी मुलीला गुजरात मधल्या एका व्यक्तीला दोन लाखात विकले तेथे त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ती आजारी पडल्याने तिला तिच्या नातेवाईकांना सोपवून दिले. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी परत नंदुरबार येथे तिची विक्री केली आणि त्या इसमाने या अल्पवयीन मुलीवर सलग दोन महिने अत्याचार केले आणि ती गर्भवती राहिली आणि ती आजारी पडल्याने तिला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर या पीडित तिला तिच्या आईवडिलांनी वेगवेगळी औषधे देऊन तिचा गर्भपात केला. आणि काही दिवसांनी ती बरी झाल्यावर एका इसमाकडून पैसे घेऊन त्याचे व त्याच्या सोबत पीडी तिचे लग्न लावून दिले. पतीनेही तिच्यावर अत्याचार केला. सासू सतत तिचा छळ करायची पीडितेने आठ महिने सहन करून आपल्या बहिणीकडे मुंबईला निघून गेली. आणि मुंबई वरून घरी आल्यावर हदगाव पोलिस ठाण्यात नातेवाईक आणि अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. अशा सात जणांवर हदगाव पोलिस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment