आता घरबसल्या सहजपणे लिंक करता येणार आधार-मतदार कार्ड, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारने संसदेत सादर केलेले निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2021 लोकसभेत मंजूर झाले आहे. मात्र, काँग्रेस, बसपासह विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. या विधेयकामध्ये मतदार कार्डशी आधार लिंक करण्याची तरतूद आहे. कायदा झाल्यानंतर मतदार यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आधार कार्ड मागण्याचा अधिकार असेल. मात्र, सध्या या विधेयकात आधार कार्डचा क्रमांक देणे ऐच्छिक ठेवण्यात आले आहे, म्हणजेच ते आता बंधनकारक असणार नाही.

निवडणुकीत बनावट मतदानाच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत, असे मोदी सरकारचे म्हणणे आहे. मतदार ओळखपत्राशी आधार लिंक केल्यास बोगस मतदान रोखण्यास मदत होईल. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यास परवानगी दिली आहे. मतदार कार्ड आधारशी लिंक करणे खूप सोपे आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे लिंक करू शकता.

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड कसे लिंक करायचे ते जाणून घेऊयात…

– सर्व प्रथम  https://voteportal.eci.gov.in वर जा.

– यानंतर मोबाईल क्रमांक / ईमेल / मतदार आयडी क्रमांक आणि पासवर्डसह लॉगिन करा.

– यानंतर, राज्य, जिल्ह्यासह तुमची वैयक्तिक माहिती द्या.

– सर्व माहिती दिल्यानंतर Search बटणावर क्लिक करा. सरकारी आकडेवारीशी माहिती जुळली तर एक नवीन तपशील तुमच्यासमोर उघडेल.

– आता तुम्हाला येथे feed aadhar number वर क्लिक करावे लागेल.

– बाकीची माहिती आधार सोबत इथे लिहा.

– सर्व माहिती तपासल्यानंतर सबमिट बटण दाबा.

– तुमचे रजिस्ट्रेशन यशस्वी झाले असे स्क्रीनवर येईल.

SMS द्वारेही लिंक करता येईल
आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी, SMS द्वारे 166 किंवा 51969 वर <Voter ID No> आणि <Aadhaar Number> पाठवा.

तुम्ही कॉल करून देखील लिंक करू शकता
एक फोन कॉलद्वारे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड देखील लिंक करू शकतात. यासाठी तुम्हाला सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत 1950 वर कॉल करावा लागेल.

Leave a Comment