Tuesday, February 7, 2023

तुम्हीच एमआयएम पक्षात या; खासदार जलील यांचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांना आमंत्रण

- Advertisement -

औरंगाबाद : उत्तर प्रदेश निवडणुकीवरून समाजवादी नेते अबू आझमी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात सध्या ट्विटर युद्ध सुरु आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत एमआयएम रिंगणात उतरणार असल्याने टीका करणाऱ्या अबू आझमी यांना पक्षात येण्याचा सल्ला खासदार जलील यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.

या ट्विटर युद्धाची सुरवात अबू आजमी यांच्या एका ट्विट द्वारे झाली. अबू आजमी यांनी एक ट्विट केले, त्यात त्यांनी एमआयएम पक्षाला उद्देशून लिहिले होते की, “उत्तर प्रदेश निवडणुकीत एमआयएम पक्षाने शंभर जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने अप्रत्यक्षरीत्या भाजपला फायदा होईल, २५ टक्के जागा लढून भाजपला हरवणे शक्य होणार नाही. मतविभाजन होऊन भाजपला फायदा होईल, असे मत अबू आझमी यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.”

- Advertisement -

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी एका ट्विटव्दारे एमआयएममध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. “तुम्ही सोबत आले तर आपण सोबत निवडणूक लढू, समाजवादी पक्षाने काय दिले, याचे आझम खान हे एक चांगले उदाहरण आहे, त्यामुळे सेक्युलिरझमचा खोटा बुरखा काढून एक वेळ आपल्या नागरिकांसाठी लढा देऊ”, असा टोला देखील जलील यांनी आपल्या ट्विट मध्ये केली. त्यामुळे आता हा ट्विटर वाद कसा रंगतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, हे नक्की.