जर आपणही बँकेत केली असेल FD तर ‘ही’ छोटीशी चूक महागात पडू शकेल ! प्राप्तिकर विभाग पाठवत आहे नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही महिन्यांत करदात्यांना आयकर विभागाकडून नोटिसा येत आहेत. आयकर विभागाच्या मेसेज आणि ईमेलद्वारे टॅक्स भरणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसा पाठविल्या जात आहेत कारण कर विभागाकडून मिळालेल्या उत्पन्नाचा तपशील करदात्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न शी (ITR) जुळत नाही.

छोटी चूक महाग पडेल
वास्तविक, बँकेत ठेवल्या जाणाऱ्या फिक्स्ड डिपोझिटवरील व्याज पूर्णपणे करपात्र आहे, परंतु इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना लोकं बर्‍याचदा हे विसरतात आणि ITR मध्ये FD व्याजातून मिळणारी कमाई दाखवत नाहीत. या छोट्याशा चुकीमुळे कर विभाग करदात्यांना नोटीस पाठवत आहे.

नोटीस टाळण्यासाठी हे करा
आयकर विभागाची नोटीस टाळायची असेल तर ITR मधील बँक FD वर मिळालेल्या व्याजाची माहिती कर विभागाला द्या, पण ITR मध्ये तपशील कसा द्यायचा हे आपल्याला माहित असले पाहिजे. वास्तविक, ITR मध्ये व्याजाद्वारे मिळणार्‍या पैशाची माहिती देण्यासाठी दोन पर्याय आहेत. करदाते आपल्या इंटरेस्ट इनकमला ITR मध्ये ईअर ऑफ एक्रुअल (year of accrual) बरोबर ईअर ऑफ रिसीप्ट (year of receipt) दाखवू शकतात. म्हणजेच, दरवर्षी किंवा FD चा रिटर्न मिळेल त्या वर्षाच्या व्याजाचा तपशीलदेखील आपण देऊ शकता, परंतु टॅक्स एक्सपर्ट असे सूचित करतात की, FD वर मिळणारे व्याज जमा झालेल्या वर्षात दाखविले जावे.

बँकेतून TDS कट केले जातात
ITR फॉर्म 26AS मध्ये दाखविल्या जाणार्‍या प्रत्येक वर्षाच्या व्याजासाठी TDS देखील कट केला जातो, यामुळे TDS आणि वार्षिक व्याजांच्या आकडेवारीत कोणताही फरक पडणार नाही आणि कर विभागाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. जर तुमचे इनकम एग्जेम्टेड लिमिटपेक्षा कमी असेल तर तुम्हाला मिळालेल्या व्याजावर TDS देण्याची गरज नाही. बँका दहा टक्के दराने TDS कट करतात.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment