‘तुम्ही IAS अधिकारी असाल’, जाहीर कार्यक्रमात केसरकरांनी अधिकाऱ्याला झापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दीपक केसरकर यांनी भरसभेत एका IAS अधिकाऱ्याला सगळ्यांच्या समोर झापले आहे. त्यांच्या (deepak kesarkar) या भाषणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमास राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) उपस्थित होते. या कर्यक्रमादरम्यान दीपक केसरकर यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर IAS अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत जोरजोरात बोलत होते. यानंतर दीपक केसरकर यांनी भाषणामध्ये व्यत्यय येत असल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर?
‘जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारीने डिसीप्लेन समजना चाहिये, हमे पता है, की तुम्हे लँगवेज का प्रॉब्लेम है. मै आखरी बार वार्निंग दे रहा हू, असे बोलून किमान मंत्र्यांचे भाषण सुरू असताना तरी बडबड करू नका ? असे सांगत सर्वासमोरच व्यासपीठावर केसरकरांनी (deepak kesarkar) IAS अधिकारी प्रत्युष पांडा यांना झापले.

केसरकरांना वाहतूक कोंडीचा फटका
भिवंडीत प्रथमच जिल्हा परिषद माझी ई शाळा डिजिटल साक्षर मिशनचे उद्घाटन काल्हेर येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडले. या ठिकाणी पोहोचण्याकरता मंत्री दीपक केसरकर यांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. हि बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी यावेळी सांगितले.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती