आता 1 एप्रिलपासून ‘ही’ टॅक्स सूट मिळणार नाही, फायदा घेण्यासाठी काय करावे ते समजून घ्या

Tax Rules On FD 
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. 1 एप्रिल 2022 पासून होम लोनवर मोठी सूट मिळणार नाही. आयकर कायदा, 1960 च्या कलम 80EEA अंतर्गत, होम लोनवर 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त टॅक्स सूट उपलब्ध होती. मात्र ही सवलत फक्त परवडणाऱ्या घरांसाठीच आहे (रु. 45 लाखांपर्यंत).

1 एप्रिलपासून तुम्हाला होम लोनवर 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार नाही, कारण सरकारने या टॅक्स सूटीचा कालावधी वाढवलेला नाही. अर्थसंकल्प 2022 मध्ये, सरकारने या टॅक्स सवलतीची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली नाही. यामुळे होम लोनवरील या सवलतीचा लाभ पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 मध्ये मिळणार नाही. होम लोनवरील ही टॅक्स सवलत आर्थिक वर्ष 2019 ते 2022 पर्यंत उपलब्ध होती.

काय फायदा होत राहील ?
होम लोनवर पूर्वीप्रमाणेच दोन मोठ्या कपाती मिळत राहतील. पहिली , कलम 24(b) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे डिडक्शन मिळत राहील. हे होम लोनच्या व्याजावर उपलब्ध आहे. दुसरे, कलम 80C अंतर्गत 1.5 ला रुपयांपर्यंतचे डिडक्शन देखील उपलब्ध राहील. हे डिडक्शन होमलोनच्या मूळ रकमेवर उपलब्ध असेल.

आता किती नफा मिळत होता ?
सध्या होम लोनच्या व्याजावर एकूण 3.5 लाख रुपयांपर्यंतचे डिडक्शन उपलब्ध होते. कलम 24(b) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे डिडक्शन उपलब्ध आहे. याशिवाय, कलम 80EEA अंतर्गत व्याजावर 1.5 लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त डिडक्शन उपलब्ध होते. अशाप्रकारे, परवडणारी घरे खरेदी केल्यावर, तुम्हाला दोन्ही मिळून 3.5 लाख रुपयांचे डिडक्शन मिळेल.

अटी
कलम 24(बी) अंतर्गत उपलब्ध रु. 1.5 लाखांपर्यंतच्या डिडक्शनसाठी काही अटी होत्या. पहिली, होमलोन 1 एप्रिल 2019 आणि 31 मार्च 2022 दरम्यान मंजूर केलेले असावे. दुसरे, घराचे मुद्रांक शुल्क 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तिसरे, घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर इतर कोणतीही घर मालमत्ता नसावी.

ITR फाइलिंग वेबसाइट tax2win.in चे CEO अभिषेक सोनी म्हणाले, “एखादी व्यक्ती 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी होम लोनवर कलम 80EEA अंतर्गत डिडक्शनचा क्लेम करू शकते.” “एकदा होम लोन मंजूर झाल्यावर, संपूर्ण होम लोनची परतफेड होईपर्यंत कोणीही या डिडक्शनचा क्लेम करू शकतो,” असे त्यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले.

आता संधी आहे
म्हणून, जर तुम्हाला कलम 80EEO अंतर्गत रु. 1.5 लाख अतिरिक्त डिडक्शनचा क्लेमचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमचे होमलोन बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून 31 मार्चपूर्वी मंजूर करून घ्यावे लागेल. मुंबईस्थित इन्व्हेस्टमेंट अँड टॅक्स एक्सपर्ट बलवंत जैन यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले की, “तुम्हाला कलम 80EEA अंतर्गत येणारे घर घ्यायचे असल्यास, तुम्हाला मुदतीपूर्वी होम लोनमंजूर करणे आवश्यक आहे. तुम्ही नंतर डिस्बर्समेंट करू शकता.”