नागपूर : हॅलो महाराष्ट्र – अनेक जणांना आपली पर्सनल डायरी लिहायची आवड असते. ते आपल्या डायरीत (personal diary) चांगल्या वाईट क्षणांची नोंद करून ठेवतात. हि डायरी ते लोक खूप जपून ठेवतात. ती कोणाच्या हाती लागू नये म्हणून योग्य ती काळजी घेतात. मात्र नागपूरमध्ये याच डायरीवरून एका उच्चशिक्षित तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. हि पर्सनल डायरी (personal diary) आपल्या काका-काकूच्या हातात लागल्यानंतर एका तरुणीने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धापेवाडा या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
निकिता डहाट असे मृत तरुणीचे नाव आहे. ती लहानपणापासूनच आजोबा रामाजी डहाट यांच्यासह धापेवाडा या ठिकाणी राहत होती. तिला आई, मोठी बहीण व भाऊ आहेत. तिने एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतले होते. तसेच एका खासगी कंपनीत तिला नुकतीच नोकरोदेखील लागली होती. याप्रकरणी मृत निकिताचा भाऊ पंकज याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर माहिती अशी कि, मृत निकिताला लहानपणापासूनच रोज डायरी (personal diary) लिहिण्याची सवय होती. तिच्या चुलत बहिणीची काही महिन्यांअगोदर शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे तिच्या काकाने निकीताला मदतीसाठी बोलावून घेतले होते. मात्र, इथे आल्यानंतर तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. काका-काकूने तिला 15-20 दिवस अक्षरश: नोकराप्रमाणे वागणूक दिली. इतकेच नव्हे तर चुलतबहिणीसोबतच पुणे येथे जा यासाठी दबावही टाकला. मात्र, तिच्या आजोबांनी याला नकार दिला. तर निकिताला मिळालेल्या वागणुकीमुळे तिने आपल्या पर्सनल डायरीत (personal diary) काकूला ‘डेव्हील ऑफ द फॅमिली’ असे उद्देशून लिहिले होते.
यादरम्यान 24 एप्रिल रोजी काका-काकू धापेवाडा आले असता त्यांना निकिताची पर्सनल डायरी (personal diary) सापडली आणि त्यांनी ती वाचली तसेच त्यांनी त्या डायरीतील काही पानांचे फोटो काढले. हे निकिताला समजताच ती तणावाखाली गेली. आता काका व काकू माझी बदनामी करतील, अशी तिला भिती वाटू लागली. तिने आपल्या डायरीत (personal diary) काकूला ‘डेव्हील ऑफ द फॅमिली’ अशी उपमा दिली होती. यानंतर निकिताने मला ‘डेव्हील’ कसे काय लिहिले याचा सर्व नातेवाईकांसमोर जाब विचारू, अशी काकूने भूमिका घेतल्याने निकिता आणखी तणावात गेली. त्यानंतर याच तणावातून तिने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. याप्रकरणी मृत तरुणी निकिता डहाट हिचा भाऊ याने पोलिसांत तक्रार दिली आहे. मृत तरुणीने काका-काकूकडून होणाऱ्या मानसिक छळाबाबत आपल्या भावाला सांगितले होते. याप्रकरणी निकिताचा भाऊ पंकज याच्या तक्रारीवरून पोलिसांनी काका रत्नाकर डहाट व काकू मंगला डहाट यांच्याविरोधात गुन्ह्य दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर