औरंगाबाद – वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा, आणि बेरोजगारीला कंटाळून एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घारी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हर्सूल भागात घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रामेश्वर हरिभाऊ धनगे असे आत्महत्या करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गेल्या चार वर्षांपासून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रामेश्वर कन्नड येथून औरंगाबादेत आला. औरंगाबादेतील हर्सूल भागात किरायची खोली घेऊन तो राहायचा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोना प्रदूर्भावाणे परीक्षाच झाल्या नाहीत. हळूहळू कोरोना परिस्थिती निवळल्या नंतर स्पर्धा परीक्षा होऊ लागल्या होत्या. रामेश्वरने अलीकडच्या काही महिन्यात अनेक परीक्षा दिल्या. मात्र त्याला यश मिळाले नव्हते रामेश्वरचा साखरपुडा जमला होता आणि येत्या २२ जानेवारी रोजी त्याचे लग्न ठरले होते.
मात्र गेल्या काही काळा पासून अनेक परीक्षा पुढे ढकलल्यागेल्या. अधिकारी होण्याचे स्वप्न परीक्षा रद्द होत असल्याने पूर्ण करता येत नव्हते तर दुसरीकडे लग्नाची तारीख जवळ यायला लागली होती. बेरोजगार त्यात लग्न झाले तर पुढे प्रपंच कसा चालवायचा ही चिंता रामेश्वरला सतावत होती.याच विवनचनेतून रविवारी संध्याकाळी रामेश्वरने राहत्या खोलीत सिलिंगला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार गाडेकर करीत आहेत.