बाथरूमच्या नळामध्ये वीजप्रवाह उतरल्याने अंघोळ करताना तरुणाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : बाथरूम मध्ये अंघोळ करताना अचानक नळामध्ये विजप्रवात उतरल्याने विजेचा धक्का बसल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी जहागीरदार कॉलोनी भागात घडली. विशाल हरिसन पवार वय-३० असे मृत तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी मृताचा मावसभाऊ स्वप्नील कांबळे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत विशाल हा  आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.तो रेल्वे मिल सर्व्हिस मध्ये कंत्राटी कामगार होता. त्याच्या वडिलांना अर्धांगवायूच झटका आल्याने ते घरीच असतात तर आई गृहिणी आहे. तिघेही किरायच्या घरात जहागीरदार कोलनीत वास्तव्यास होते.

आज दुपारी दीडच्या सुमारास विशाल अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला मात्र काही वेळातच भांड्याचा जोराचा आवाज झाल्याने आईने बाथरूमकडे धाव घेतली असता विशाल तडफडत होता. त्या अवस्थेत त्याने आईला पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने संगीतले.

आईने आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी घरात धाव घेत लाकडी बल्लीने विशाल ला बाहेर काढले व रुग्णालयात हलविले.मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.