अमेरिकन मैत्रिणीच्या प्रेमात पडला तरुण; तिनं ऑनलाइनच केलं ‘हे’ कृत्य, त्यांनतर…

औरंगाबाद – प्रेम आंधळे असते असे म्हणतात, प्रेमात माणूस सर्वकाही भान हरवून जातो. परंतु आजकाल प्रेमात पैसे उकळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच वाळूज परिसरातील प्रख्यात कंपनीचा फायनान्स मॅनेजर सोशल मीडियावरच्या अमेरिकन मैत्रिणीच्या प्रेमात पडला. तिने भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल 3 लाख रुपये उकळले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर सदर मॅनेजरने पोलिसात धाव घेतली. फायनान्स मॅनेजर विटखेडा परिसरात राहत असून फसवणूक झाल्यानंतर त्याने सातारा पोलिस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार नोंदवली. पोलिस आता या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, मे महिन्यात विटखेडा परिसरात राहणाऱ्या मॅनेजरची अमेरिकेतील इसाबेल लिझी मॉर्गन या महिलेशी दोस्ती झाली. काही दिवसांनंतर मेसेज आणि फोनवर बोलणे सुरु झाले. व्हॉट्सअप चॅटिंगही सुरु झाले. त्यानंतर महिलेने मॅनेजरला अमेरिकेतून महागडी भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. ती सोडवून घेण्यासाठी मॅनेजरला भारतीय सिरीज क्रमांकावरून कॉल प्राप्त झआला. लिझी मॉर्गन नावाच्या महिलेने तुमच्या नावावर पार्सल पाठवले आहे, असे सांगण्यात आले.

क्लिअरन्ससाठी टप्प्या-टप्प्याने तीन लाख रुपये उकळले. अनेक कारणे देऊन 3 लाख रुपये उकळल्यानंतर मॅनेजरने भेटवस्तूची वाट पाहिली. सदर मैत्रिणीला कॉल करून पाहिल्यास तिचा फोन क्रमांकही बंद होता. आपण फसलो आहोत, हे कळताच मॅनेजरने सातारा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे अधिक तपास करीत आहेत.

हे पण वाचा –

धक्कादायक ! ठाण्यात 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार

धक्कादायक ! घरगुती वादातून पाच लेकींसह आईची आत्महत्या

मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे हताश पित्याने उचललं ‘हे’ पाऊल

धक्कादायक ! 5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्या पित्याने केला खून

धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधातून भाच्याच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

You might also like