विशेष प्रतिनिधी । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच क्रमांकाच्या वसतिगृहात मंगळवारी काही तरूण गोंधळ घालत असल्याचे सुरक्षा रक्षकांना समजले. त्यांनी पाहणी केली असता, एका खोलीत काही जण दारू पीत असल्याचे आढळले. सुरक्षारक्षकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले यांनी अधिक माहिती दिली . हे तरूण सध्या विद्यापीठात शिकत नाहीत. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.