ग्रामिण भागातील तरुण – तरुणी ‘इथे’ बनवतायत कोरोनावर औषध; पृथ्वीराज चव्हाणांनी दिली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील ईसरा (ISERA) बायोलॉजिकल या कंपनीत कोरोनावर औषध बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामिण भागातील तरूण- तरूणी करत असलेल्या संशोधनाच्या या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच भेट दिली आहे. ईसरा बायोलाॅजिकल ही कंपनी कोव्हीडवर औषध तयार करण्याचे संशोधन करत असल्याची माहीती पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

कोरोनावर सध्या लस आलेली असून आता अजून काही नविन औषध बाजारपेठेत येईल का याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. कोव्हीडवर अनेक कंपन्या वेगवेगळे प्रयोग करत असून संशोधन करत आहेत. अशाच पध्दतीने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा येथेही संशोधन केले जात आहे.  

शिराळा येथील ईसरा बायोलाॅजिकल या अद्यावत औषध निर्मिती प्रकल्पामध्ये ग्रामीण भागातील अनेक कार्यक्षम व तज्ञ युवक व युवती काम करत आहेत. आता ते कोव्हिडवर औषध तयार करण्याचे संशोधन करीत आहेत. या कंपनीला माझ्या शुभेच्छा, असे ट्विट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.