अहमदनगर :हॅलो महाराष्ट्र – अहमदनगर जिल्ह्यातून बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना सांगितली म्हणून मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या (Murder) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बहिणीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात 30 सप्टेंबर रोजी 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. पहिल्यांदा हि आत्महत्या असल्याचे वाटत होते. मात्र यानंतर अधिक तपास केला असता हि आत्महत्या नसून हत्या (Murder) असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हि हत्या (Murder) दुसऱ्या कोणी केली नसून मृत मुलीच्या मोठ्या बहिणीने केली आहे.
आरोपी मोठी बहीण सृष्टी हिचे श्रीरामपुर तालुक्यातील आकाश कांगुणे नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. ती त्या तरुणासोबत पळून जाणार असल्याचे मृत तरुणीने घरी सांगितले होते. त्यानंतर घरच्यांनी सृष्टीला समज दिली होती. तसेच काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली. याचा राग मनात धरून सृष्टीने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून आपल्या लहान बहिणीची हत्या (Murder) केली. हत्येनंतर आरोपी सृष्टी ही प्रियकरासोबत ठरल्याप्रमाणे पळून गेली. यानंतर पोलिसांनी कसून तपास करत आरोपी बहीण सृष्टी आणि तिचा प्रियकर आकाश कांगुणे यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी सृष्टी बानकर हिच्यावर कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!