सोलापूर | नोकरीचे आमीष दाखवून गंडा घालण्याचे प्रकार अलीकडील काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढले अाहेत. असाच एक धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला आहे. कॅनडा देशात नोकरी लावतो असं आमिष दाखवून भामट्यांनी तरुणाला चक्क पावणे तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी शोधणार्या तरुणांमधे एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाचे –
दिल्लीत २ संशयित दहशतवादी घुसले
चर्चा नको, आधी मदत जाहीर करा, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल
हाती आलेल्या माहीतीनुसार, मनुकुमार बसण्णा ( त्रिमूर्ती नगर, विजापूर रोड, सोलापूर ) असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मनुकुमार यास “एम मायग्रेशन” या वेब साईट वरून नोकरी चा संदेश आला होता. सदरील संदेशाला मनूने सकारात्मक उत्तर दिले. त्यानंतर वेळो वेळी वेबसाईट वरुन मनुकडून नोकरी लावण्याकरता फी च्या नावाखाली तब्बल पावणे तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपींनी रक्कम एसबीआय बॅंकेच्या खात्यात टाकण्यास सांगितले. मूळचा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याचा असणारा मनु रोजगारांमुळे व्यथित होता. त्यामुळे त्या संदेशला त्याने उत्तर दिले आणि २,८२,००० रुपये भरले. हि रक्कम मे ते ऑकतोबर या कालावधीत मनुकुमार ने भरली होती. पैसे भरून सुद्धा दोघे हि टाळाटाळ करत असल्याचं लक्षात येता मनुकुमार ने पोलिसांत धाव घेतली.
पोलीस तपासात फसवणूक करणारे भामटे मूळचे कोलकाता येथील असल्याचे निदर्शनास आले आहे. गेरल रेनॉल्ड आणि शाहिद अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांवर सोलापूर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सय्यद करत आहेत.