वाढत्या पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती विरोधात कराडमध्ये युवक काँग्रेसकडून जोरदार विरोध प्रदर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेल,गॅसच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. वाढत्या गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किमती विरोधात कराडमध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील गांधी पुतळ्या समोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी युवक काँग्रस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, कराड उत्तर अध्यक्ष अमित जाधव, अभिजीत पाटील, नगरसेवक राजेंद्र माने,डॉ. इंद्रजित गुजर, कराड दक्षिण अध्यक्ष वैभव थोरात, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, प्रवक्ते दिग्विजय सुर्यवंशी, अमीर आत्तार, अतुल थोरात, विवेक चव्हाण, राहूल थोरात, प्रशांत यादव, विक्रम पाटील, प्रकाश पिसाळ, शुभम लादे, विरेंद्र सिंहासने यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अक्कड बक्कड डिझेल नब्बे… पेट्रोल सौ, सबका साथ विश्‍वासघात, वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल, कहाँ गये.. कहाँ गये अच्छे दिन,नही चलेंगी.. नही चलेंगी तानाशाही नहीं चलेगी, मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत कराड येथे युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल- डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आंदोलन केले. तसेच कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोल पंप मार्गावर फेरी काढत रास्ता-रोको करण्यात आला.

कोरोनामुळे जनता आधीच मेतकुटीला आली असून मोदी सरकार कडून वारंवार पेट्रोल डिझेल दरवाढ होत आहे याचा युवक काँग्रेस कडून आम्ही निषेध करत आहोत अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेस राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिली. ”राज्यातील जिल्हा, तालुका पातळीवर युवक काँग्रेसचे पेट्रोल- डिझेल या दरवाढी विरोधात आंदोलन चालू आहेत. डिझेल-पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत. ज्यावेळी काँग्रेसचे सरकार होते तेव्हा मोदी, अमित शहा, स्मृती इराणी, अरूण जेटली या भाजपच्या नेत्यांनी देशात इंधन दरवाढीविरोधात रान पेटवले होते. याशिवाय सत्तेत आल्यास पेट्रोल- डिझेलचे भाव 35- 40 रूपये पर्यंत करू असं आश्वासन दिलं होत. मात्र, आज डिझेल 90 तर पेट्रोल शंभरच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनामुळे मजूर, छोटे व्यापारी, शेतकरी हे वर्षभर त्रस्त झालेले आहेत. अशावेळी युवक काँग्रस पेट्रोल- डिझेल,गॅस दरवाढीचा निषेध करत आहे,” असं मोरे म्हणाले.

Leave a Comment