सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. सोलापूर शहरातील मित्र नगर शेळगी येथील सुनील नगरमध्ये हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे.
आरोपी अतुलला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वी अतुलने आपली आई वंदना एकनाथ कोळेकर यांच्याकडे पैशाची मागणी केले होती. मात्र आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याचा अतुलला राग आला. याच रागातून अतुल याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आरोपीने आईच्या डोक्यात कुकरी सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून तिला ठार मारले आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी अतुल याने आई वंदनाकडे पैसे मागितले होते मात्र तिने ते दिले नव्हते. याचा राग आरोपीच्या मनात होता. यातूनच त्याने खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. तसेच या खुनामागे आणखी काही कारण आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.