रोहित पवार आमदार व्हावेत, तरूणांचे रायगडवर जाऊन जगदिश्वराला साकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | विधानसभेेसाठी अवघे 100 दिवस शिल्लक राहिले आहेत. रोज नवनविन घडामोडी घडत असताना 5 युवकांनी शरद पवारांचे नातू रोहित पवार आमदार व्हावेत यासाठी चक्क राजधानी किल्ले रायगड येथे जाऊन जगदिश्वराला साकडे घातले आहे. आकाश झांबरे पाटील, साहिल रायकर, ओमप्रसाद कत्ते, धिरज घुटे, परिक्षित तळोलकर अशी त्या युवकांची नावे आहेत.

रोहित पवार सारख्या तरुण नेतृत्वाची आज उभ्या महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे आम्ही रायगडावर येऊन जगदिश्वराला साकडे घातले असून महादेवाला अभिषेक देखील केला असल्याचे आकाश झांबरे पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर सर्वांना आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ यांनी लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर आता त्यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. त्याच अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी पक्षाकडे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री राम शिंदे हे सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची होणार आहे.युवकांमध्ये रोहित पवार यांच्याविषयी मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. सृजनच्या माध्यमातून ते कायम समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. दुष्काळग्रस्त भागासाठी त्यांनी राज्यभर सृजनच्या माध्यमातून टँकरदेखील सुरु केले आहेत.

Leave a Comment