Thursday, February 2, 2023

मोठी बातमी! ‘Google’मध्ये तांत्रिक बिघाड; Gmail, Youtube आणि Googleशी निगडीत इतर सेवांवर परिणाम

- Advertisement -

मुंबई । जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे.

डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात अडचण नेटिझन्सना अडचण येत आहे. दरम्यान, ‘गुगल’कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

- Advertisement -

जीमेलची सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.  भारतात युट्यूब, जीमेल युजर्सची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर सेवा ठप्प झाल्याचा मोठा परिणाम झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’