हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचा ICC ने सन्मान केला आहे. यंदाच्या T20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी आयसीसीने युवराजची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. युवराज सिंग (Yuvraj Singh) सोबतच वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि उसेन बोल्ट यांनाही या स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे. खरं तर युवराज सिंग हा भारताच्या महान खेळाडूंमध्ये गणला जातो. भारताने जिंकलेल्या T20 World Cup आणि २०११ मधील ५० षटकांच्या वर्ल्डकप मध्ये युवराजने देदीप्यमान कामगिरी केली होती.
आयसीसीने ट्विट करत युवराज सिंगच्या नियुक्तीबाबत माहिती दिली आहे. युवराजची T20 World Cup ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाल्याने चाहत्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. यंदाच्या T20 विश्वचषक 2024 चे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. 01 ते 29 जून दरम्यान हा वर्ल्डप कप खेळवण्यात येणार असून तब्बल 20 संघ सहभागी होत आहेत. वेगवेगळ्या ग्रुपनुसार सामने होतील. भारताच्या ग्रुप मध्ये आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा या संघाचा समावेश आहे. सर्वच जण भारत पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट बघत आहेत.
युवराजचे वर्ल्डकपशी खास नातं
2007 मध्ये पहिल्यांदा T-20 विश्वचषक खेळला गेला. त्या विश्वचषकात युवराज सिंगने सलग सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकण्याच्या विश्वविक्रम केला होता. 19 सप्टेंबर 2007 रोजी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ गगनचुंबी षटकार मारत हा महारेकॉर्ड केला होता, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा तो भारताचा पहिला आणि दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सनंतर दुसरा फलंदाज ठरला. युवराजचा हा रेकॉर्ड तोडणं इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोडता आलेला नाही.